नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला असतानाच सत्ताधारी भाजपविरुद्ध विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. काही दिवासांपूर्वी पाटणा येथे १७ विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीनंतर एक सर्व्हे करण्यात आला ज्यात आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येईल याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला गेला.
टाइम्स नाऊ नवभारतने केलेल्या ताज्या सर्व्हेमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार असल्याचे म्हटले आहे. या सर्व्हेनुसार भाजप तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येईल. भाजप आणि मित्र पक्षांना २८५ ते ३२५ जागा मिळतील असा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे. विरोधी पक्षांची बैठक झाल्यानंतर हा सर्व्हे करण्यात आला होता. सर्व्हेनुसार आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास भाजप आणि मित्रपक्षांना २८५ ते ३२५ जागा मिळू शकतील. काँग्रेसला १११ ते १४९, तिसऱ्या क्रमांकावर वायएसआर काँग्रेस २४ ते २५ जागांसह असेल. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला २० ते २२ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बीजेडीला १२ ते १४, बीआरएसला ९ ते ११, आम आदमी पक्षाला ४ ते ७, समाजवादी पक्षाला ४ ते ८ आणि अन्य पक्षांना १८ ते ३८ जागा मिळतील, असे या सर्व्हेत म्हटले आहे.
२०१९ च्या निवडणुकीत ३०३ जागा मिळाल्या होत्या. मित्र पक्षांच्या जागा विचारात घेतल्या तर ही एकूण संख्या ३५३ इतकी होते. ताज्या सर्व्हेचा विचार केला तर भाजपच्या जागा कमी होतील असे दिसत आहे. तर काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या होत्या. या सर्व्हेनुसार काँग्रेसच्या जागा दुप्पट होतील. पण असे असले तरी सत्ता मात्र भाजपची येईल, असे या सर्व्हेत म्हटले आहे.
भाजप आणि मित्र पक्ष- २८५ ते ३२५
काँग्रेस- १११ ते १४९
वायएसआर काँग्रेस- २४ ते २५
तृणमूल काँग्रेस- २० ते २२
बीजेडी- १२ ते १४
बीआरएस- ९ ते ११
आम आदमी पक्ष- ४ ते ७
समाजवादी पक्ष- ४ ते ८
अन्य- १८ ते ३८