NGN News
Latest Marathi News

स्व. दादासाहेब रत्नपारखी स्मृतीग्रंथ प्रकाशन १ फेब्रुवारी रोजी

  • शरदराव ढोले प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व नासिक विभाग कार्यवाह स्व.प्रा. दादासाहेब रत्नपारखी यांच्या स्मृतींना उजाळा देणारा “मार्तंड जो तापहीन” या स्मृतीग्रंथाचे प्रकाशन एक फेब्रुवारी (रविवार) रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर मुंजे इन्स्टिट्यूट च्या सभागृहात होत आहे.

या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण समन्वय संयोजक शरदराव ढोले असून संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांची विशेष उपस्थिती असणार आहे. नाशिकच्या हं. प्रा. ठा. महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक राहिलेल्या दादासाहेब रत्नपारखी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक शहर कार्यवाह, जिल्हा कार्यवाह तसेच नाशिक विभाग( नाशिक, धुळे, जळगाव) कार्यवाह म्हणून तीन दशकांहून अधिक काळ संघाचे कार्य केले.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी चे सरकार्यवाह,आयुर्वेद सेवा संघ उपाध्यक्ष, शंकराचार्य न्यास अध्यक्ष तसेच भगूर शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटी या संस्थांचे पदाधिकारी या नात्याने शैक्षणिक व सामाजिक संस्थांची जबाबदारी त्यांनी अतिशय समर्थपणे व निःस्वार्थीपणे पार पाडली.

“मार्तंड जो तापहीन” स्मृतीग्रंथात कै.दादासाहेबांच्या सहवासात आलेल्या विविध मान्यवर, स्नेही,आप्तेष्ट यांच्या प्रेरक स्मृतींना उजाळा मिळाला आहे. या प्रकाशन सोहळ्य़ास उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक विभाग संघचालक कैलासनाना साळुंके, जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी आणि संपादक गोविंद यार्दी आदींनी केले आहे.

Comments are closed.