NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

मोठी दुर्घटना ! रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळली; ५ जणांचा मृत्यू..

0

रायगड/एनजीएन नेटवर्क

 जिल्ह्यात खालापूरजवळ कर्जत तालुक्यात इर्शाळवाडी येथे अत्यंत भीषण अशी घटना घडली आहे. बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली आहे. जवळपास ४० घरे ढिगाऱ्याखाली दबली गेल्याची तसेच १२० ते १३० जण दरडीखाली सापडल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे हे उपस्थित आहेत. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत २५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर २१ जणांवर नवी मुंबईतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. वाचवण्यात आलेल्या २५ जणांपैकी ५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.  बचावकार्यासाठी एनडीआरएफसह इतर यंत्रणा सज्ज आहेत.

घटनास्थळ हे दुर्गम भागात असल्याने आणि पावसामुळे बचावकार्यात काहिसे अडथळे येत आहेत. हवामानाची स्थिती लक्षात घेऊन येथे हेलिकॉप्टर द्वारेही बचावकार्य केलं जाणार आहे. तसेच अद्याप या ठिकाणी अजूनही दरड खाली येण्याचा धोका कायम आहे. परिसरात गावकऱ्यांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला आहे. अतिशय भीषण आणि मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. सकाळी साडेसहा वाजेपर्यंत बचावकार्य सुरू झालेले नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत मदत आणि बचावकार्याचा आढावा घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.