मुंबई/एनजीएन नेटवर्क
अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत ब्रेकअप केल्यानंतर आयपीएल संस्थापक ललित मोदी आता सुपरमॉडल उज्जवला राऊतला डेट करत आहेत. ललित मोदी आणि उज्जवला यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ललित मोदी आणि उज्जवला राऊत यांना वकील हरीश साळवे यांच्या रिसेप्शनच्या वेळी एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये ललित मोदी यांनी काळ्या रंगाचा सूट परिधान केला असून उज्जवलाने छान गाऊन परिधान केला आहे. फोटोमध्ये दोघेही आनंदी दिसत आहेत. अद्याप दोघांनीही त्यांचे नाते जगजाहीर केलेले नाही. 90 च्या दशकातील सुपरमॉडल म्हणून उज्जवला ओळखली जाते. उज्जवलाचे वडील पोलीस अधिकारी होते. तरुणपणातच तिने मॉडेडिंगच्या करिअरची सुरुवात केली. वयाच्या 17 व्या वर्षी तिने ‘फेमिना मिस इंडिया’ या फॅशन शोमध्ये भाग घेतला आणि ‘फेमिना लुक ऑफ द ईयर’ हा पुरस्कार जिंकला.