नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शऱण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपट्टूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या आऱोपांची चौकशी सध्या सुरू आहे. दरम्यान, काही कुस्तीपट्टूंनी पुरावे म्हणून दिल्ली पोलिसांकडे ऑडिओ आणि व्हिडीओ दिले आहेत. पोलिसांना या प्रकरणी आज (दि. १५ ) आरोपपत्र दाखल करायचे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोप करणाऱ्या 6 महिला कुस्तीपटूंपैकी चार कुस्तीपट्टूंनी पोलिसांना पुरावे दिले आहेत. यामहिला कुस्तीपट्टूंनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत बृजभूषण हे काहीतरी निमित्त काढून चुकीच्या हेतूने स्पर्श करायचे असा आरोप केला होता. यानंतर पोलिसांनी आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करण्यास सांगितलं होतं. रविवारी या महिलांनी पोलिसांना पुरावे दिले. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत जवळपास 200 लोकांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. यामध्ये तक्रारदार कुस्तीपट्टू, प्रशिक्षक, रेफ्री, बृजभूषण सिंह यांच्या सहकाऱ्यांचाही समावेश आहे. बृजभूषण यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी 5 देशांच्या कुस्ती महासंघांकडे मदत मागितली होती. दिल्ली पोलिसांनी या पाचही देशांच्या महासंघांना पत्र पाठवून व्हिडीओ आणि फोटो इत्यादी माहिती मागितली होती.