नाशिक/एनजीएन नेटवर्क
हॉटेल तपासणी दरम्यान निरंक अहवाल पाठवून बालकामगार असल्याने गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात ५ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी दुकाने निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांच्याकडे बाल कामगार असल्याची बतावणी करून कामगार उपयुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षक निशा बाळासाहेब आढाव यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली. लाच दिल्यास निरंक अहवाल पाठवून बालकामगार असल्याने गुन्हा दाखल न करण्याचे आढाव यांनी कबुल केले. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. आढाव यांना कामगार उपयुक्त कार्यालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती.