NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

सिन्नर भूमी अभिलेख कार्यालयातील महिला अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना अटक

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

तक्रारदराने खरेदी केलेल्या प्लॉटच्या रेकॉर्डवरील जुन्या मालकाचे नाव कमी करून दुसऱ्या नावाची नोंद करण्यापोटी ५ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सिन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील महिला उपअधीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराने मनेगाव (ता. सिन्नर) येथे खरेदी केलेल्या प्लॉटचे सिटी सर्व्हे नंबर रेकॉर्डवर जुन्या मालकाचे नाव होते. त्यामध्ये बदल करून तक्रारदाराला स्वतःच्या पत्नीचे नाव लावायचे होते. यासंदर्भात, सिन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक उपअधीक्षक प्रतिभा दत्तात्रय करंजे यांनी सदर कामासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तशा आशयाची तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात येवून करंजे यांना भूमी अभिलेख कार्यालयात लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.