पाटणा/एनजीएन नेटवर्क
बिहारमधील सीवान जिल्हामध्ये एक बाळंतपण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हे बाळंतपण एखाद्या चमत्कारासारखं असल्याचं म्हटलं जात आहे. सामान्यपणे एखादी महिला बाळंतीण होते तेव्हा ती 2 किंवा जास्तीत जास्त 3 बाळांना एकाच वेळी जन्म देते. मात्र सीवानमधील एका महिलेने एकाच वेळी 5 बाळांना जन्म दिला आहे. या महिलेचं नाव पुजा सिंह असे आहे. मात्र या महिलेने जन्म दिलेल्या 5 बाळांपैकी केवळ 2 बाळं जिवंत असून 3 बाळांचा मृत्यू झाला आहे. मात्र एकाच वेळी एका महिलेने 5 बाळांना जन्म दिल्याचं पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
सध्या पुजाच्या या बाळांतपणाची चर्चा संपूर्ण बिहारमध्ये सुरु आहे. सीवानमधील हसनपुरा येथील तिलौता रसूलपुर गावाची रहिवाशी आहे. या माहिलेने सीवानमधील एका खासगी रुग्णालयामध्ये एकाच वेळी 5 बाळांना जन्म दिला. मात्र यापैकी 2 बाळं मृतावस्थेतच गर्भातून बाहेर काढण्यात आली. गर्भाबाहेर काढल्यानंतर 3 बाळं जिवंत होती. त्यापैकी एका बाळाचा नंतर मृत्यू झाला. पुजाने जन्म दिलेल्या 5 बाळांपैकी 2 बाळं जिवंत असून त्यांची प्रकृती उत्तम असल्यांच डॉक्टरांनी सांगितलं आहे. पुजाने जन्म दिलेल्या बाळांपैकी 3 मुलं होती तर 2 मुली होत्या. प्रसुतीच्यावेळी 2 मुलांचा मृत्यू झाला. जन्मानंतर काही दिवसांनी एका मुलीचाही मृत्यू झाला. सध्या पुजाची एक मुलगी आणि मुलगा जिवंत असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.