NGN News
Latest Marathi News

महिला डॉक्टरचा विनयभंग; महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्याला बेड्या

जळगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क

महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याच्या गंभीर आरोपावरून निलंबित प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या घातल्याची घटना जळगाव येथे घडली आहे. डॉ. विजय घोलप असे या अधिकाऱ्याचे नाव असून तो पिडीत महिलेशी अश्लील संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता तसेच त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी करत छळ केला. या प्रकारामुळे त्रस्त होऊन पीडितेने प्रथम महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आणि त्यानंतर थेट शहर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलसांनी कारवाईचा बडगा उगारला.

प्राप्त माहितीनुसार, डॉ. घोलप हा महिला डॉक्टरच्या केबिनमध्ये वारंवार येऊन अश्लील टिपण्या करत होता. एके दिवशी त्याने तिला स्वतःच्या केबिनमध्ये बोलावून थेट शरीरसुखाची मागणी केली, असे पीडितेने तक्रारीत स्पष्टपणे नमूद केले आहे. तक्दारारीनंतर त्याने पीडितेवर प्रचंड मानसिक दबाव टाकण्यात आला. पीडितेच्या घरी तसेच तिच्या पतीच्या कार्यालयात काही व्यक्तींना पाठवून धमकावण्यात आले. महिलेच्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत डॉ. विजय घोलप याला अटक केली.

Comments are closed.