जळगाव/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा शनिवारी ( दि. 2 ) वाढदिवस मुक्ताईनगरमध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांची लाडू तुला करण्यात आली. तथापि कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडला. लाडू हिसकावून खाण्यासाठी तोबा गर्दी केलेली पाहायला मिळाली.
खडसेंच्या कार्यक्रमाचे ढिसाळ नियोजन हा जिल्हाभर चर्चेचा विषय बनला आहे. प्राप्त माहितीनुसार, खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त लाडूतुला करण्यात आली. लाडूतुला झाल्यानंतर लाडू घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली केल्याने कार्यक्रमस्थळी एकच झुंबड उडाली होती. लाडू मिळावा म्हणून नागरिकांसह लहान मुलांनी जीवाचे रान करून लाडू घेण्यासाठी प्रयत्न केले. कोणी खिशात भरले, कोणी दोन हात भरुन घेतले तर कोणी पूर्ण बॉक्स घेऊनच पळाले. अवघ्या 2 मिनिटांत सर्व लाडू संपले. या प्रकारची सर्वत्र चर्चा होत आहे.