हैदराबाद : एनजीएन न्यूज नेटवर्क
हैदराबादहून बंगळुरुला जाणाऱ्या बसची एक बाइक बरोबर धडक झाली आणि होत्याचे नव्हते झाले. धडकेनंतर प्रवासी बसला आग लागली. या दुर्घटनेत 20 प्रवाशांचा मृत्यू झाला शुक्रवारी पहाटे ही भीषण दुर्घटना झाली. बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते.
प्राप्त माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या कुरनूल जिल्ह्यात कल्लूर येथील चिन्नाटेकुरु गावाजवळ हा भीषण अपघात झाला. घटनेच्यावेळी परिसरात पाऊस सुरु होता. बाइकचा स्फोट झाल्यानंतर काही वेळात बसला आगीच्या ज्वाळांनी वेढलं. 12 प्रवासी कसेबसे इमर्जन्सी एग्झिटमधून बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. स्थानिक लोकांनी लगेच मदत कार्य सुरु केले. पोलीस आणि फायर ब्रिगेडला सूचना दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली. बसमधील प्रवाशांपैकी बहुतांश हे हैदराबाद आणि बंगळुरु दरम्यान काम करणारे प्रवासी असल्याचं सांगितलं जातय. पोलिसांनी घटनास्थळ सील करुन तपास सुरु केला आहे. प्रारंभिक चौकशीत अशी शंका आहे की, बस चालक खूप वेगात होता आणि पावसामुळे दृश्यमानता कमी असल्यामुळे समोरुन येणारी बाइक दिसली नसावी.
Comments are closed.