स्थिर उत्पन्न गुंतवणूक पर्यांयांमध्ये गुंतवणूकीच्या मजबूत संधी
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
आगामी वर्षात शेअरबाजाराची वाटचाल कशी राहील, याबाबत अंदाज व्यक्त करणारा मार्केट आउटलुक २०२६ हा अहवाल कोटक महिंद्रा ऍसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (“केएमएएमसी”/“कोटक म्युच्युअल फंड”) ने आज प्रसिध्द केला. या अहवालात आगामी वर्षात भारताच्या वित्तीय बाजारपेठांना आकार देणारे ढोबळ आर्थिक वातावरण तसेच गुंतवणूकीच्या कोणत्या प्रमुख संकल्पना अग्रभागी राहतील, याबाबतचा व्यापक दृष्टिकोन सादर करण्यात आलेला आहे. या अहवालात समभाग, स्थिर उत्पन्न योजना आणि विविध क्षेत्रातील संकल्पना या आधारे निर्माण होणाऱ्या विविध संधींकडे लक्ष वेधण्यात आलेले आहे. तसेच गुंतवणूकदारांनी आगामी वर्षात बारकाईने लक्ष ठेवावेत, अशा जागतिक आणि देशांतर्गत प्रवाहांवरही हा अहवाल प्रकाशझोत टाकतो.
कोटक महिंद्रा एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शाह या अहवालाबाबत टिप्पणी करताना म्हणाले, “आर्थिक वर्ष २०२६ मध्ये समभागांचा परतावा कंपन्यांच्या उत्पन्न वाढीवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे. भारतीय कंपन्यांचे उत्पन्न आर्थिक वर्ष २७ मध्ये दुहेरी अंकात वाढेल, असा आमचा अंदाज आहे. भारतीय कंपन्यांच्या भरीव कामगिरीची ही ताकद विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांना भारतीय शेअरबाजाराकडे आकर्षित करेल आणि त्यामुळे बाजारात तरलतेला आणखी पाठबळ मिळेल. मिडकॅप समभाग हे लार्ज आणि स्मॉल कॅप्स समभागांपेक्षा अधिक उत्तम कामगिरी बजावण्यास सज्ज आहेत. परंतु कामगिरीतील वाढ काही प्रमाणात कमी राहू शकते. जगभरातील मध्यवर्ती बँकेकडून सातत्याने सुरू असलेल्या खरेदीमुळे सोने आणि चांदीच्या दरांमध्ये आणखी वाढ दिसून येईल. गुंतवणूकदारांनी परताव्याबाबतच्या आपल्या अपेक्षा माफक ठेवल्या पाहिजेत. तसेच बाजारातील बदलत्या गतीवर मात करण्यासाठी विविध मालमत्ता वर्गांसाठी संतुलित तसेच वैविध्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारण्याचा सल्ला आम्ही दिलेला आहे.”
२०२६ करिता समभागांतील प्रमुख गुंतवणूक संकल्पना
१) वित्तीय सेवा: वाढ आणि नफ्यात वधारणा
कर्जपुरवठ्याचा वेग वाढत चालला आहे. यातून कर्ज देण्याच्या उलाढालीत सुधारणा होत असल्याचे दिसून येते. वधारलेल्या कर्ज-ठेव गुणोत्तरातून ही वाढ दिसून येते. मूलभूत घटक आणखी बळकट झाल्याने त्याचबरोबर सुधारलेल्या भांडवली पर्याप्ततेमुळे कर्जवाढीला पाठबळ मिळाले आहे. परतावा गुणोत्तर उंचावल्याने हे क्षेत्र आता दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी आकर्षक बनले आहे. कर्ज आणि ठेव वाढीतील तफावत कमी झाल्याने नफ्यावरील दबाव कमी होऊ शकतो. त्यामुळे वित्तीय संस्थांचा नफा वाढण्यास मदत होऊ शकते.
2) ग्राहकपयोगी वस्तूंच्या वापरात उसळीः गतीत वाढ
वाढते उत्पन्न, जीएसटी सुधारणा आणि सणासुदीच्या काळातील मागणीमुळे ग्राहकपयोगी वस्तूंच्या उपभोगात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील दरडोई उत्पन्नाने २००० डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. तो अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे, कारण हे वाढलेले उत्पन्न सामान्यतः आवश्यक खर्चाची पातळी आणखी उंचावण्यास चालना देते. विशेषतः वाढलेल्या उत्पन्नाचा लाभ वाहन उद्योगासारख्या क्षेत्रांना अधिक प्रमाणात होत आहे. जगाच्या तुलनेत भारताचा समावेश दुचाकी आणि प्रवासी वाहनांचे अत्यल्प प्रमाण असलेल्या बाजारपेठांमध्ये होतो. परंतु तरुणाईच्या वाढत्या आकांक्षा, जीएसटी करातील सवलत, महागाई दरात नरमाई आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेने घेतलेली गती यामुळे वाहनांच्या मागणीत वाढ होणार आहे. वाहनांच्या मासिक विक्रीच्या आकड्यांच्या प्रवाहातून मागणीत झालेली वाढ प्रतिबिंबित झालेली असून विक्रीचे आकडे वाहनांचा अधिकाधिक वापर आणि ब्रण्डेड वाहन खरेदी करण्याकडे सुरु झालेली संरचनात्मक वाटचाल दर्शवितात.
३) ई-कॉमर्सः डिजीटल प्रक्रियेला वेग
अल्प प्रमाणातील शिरकाव आणि डिजीटल व्यवहारांच्या वाढत्या प्रमाणामुळे भारताच्या ई-कॉमर्स बाजारपेठेच्या वाढीला प्रचंड वाव आहे. आर्थिक वर्ष ३० पर्यंत या बाजारपेठेचे प्रमाण १२ ते १३ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा असून त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, सौंदर्यप्रसाधने आणि वैयक्तिक आरोग्यविषयक साधनांसारख्या वस्तूंची बाजारपेठ आणखी विस्तारणार आहे. ई-कॉमर्सची बाजारपेठ अत्यंत केंद्रीकृत राहणार असून यामध्ये आघाडीच्या तीन कंपन्यांचा बाजारपेठेतील हिस्सा जवळपास ८० टक्के राहणार आहे. संघटित रिटेल क्षेत्र आणि ब्रॅण्डेड वस्तू खऱेदी या दोन्ही घटकांच्या वाढत्या प्रवाहामुळे या उद्योगाचा आकार वाढण्यासाठी त्याचबरोबर नफा उंचावण्यासाठी अतिशय सक्षम मार्ग तयार झालेला आहे.
४) आरोग्यसेवा क्षेत्रातील संधी
वृद्धांची वाढती लोकसंख्या आणि वाढत्या दीर्घकालीन आजारांमुळे आरोग्यसेवेवरील खर्च वाढत आहे. भारत हा वृद्धांची सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे4 आणि पुढील २५ वर्षांत ती दुप्पट होण्याची अपेक्षा आहे5. या संरचनात्मक बदलामुळे आरोग्यसेवांच्या मागणीत वाढ होईल.
स्थिर उत्पन्न योजनांबाबतचा दृष्टीकोनः
शेअरबाजारपेठेतील बदलणारी परिस्थिती पाहता, स्थिरतेला अधिकाधिक प्राधान्य देताना जोखीम व्यवस्थापनाला हातभार लावणारा स्थिर उत्पन्न पोर्टफोलिओ महत्वाची भूमिका बजावेल. ब्लूमबर्ग ग्लोबल अॅग्रीगेट इंडेक्समध्ये प्रवेश करण्याच्या भारताची शक्यता बळकट झाली असून त्याबाबत जानेवारी २०२६ मध्ये औपचारिक निर्णय अपेक्षित आहे. या निर्णयामुळे सुमारे २५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भारतात येण्याची शक्यता आहे. संतुलित स्वरुपातील मागणी आणि पुरवठ्यात गतिशीलतेबरोबरच ढोबळ अर्थव्यवस्थेतील सहाय्यक मूलभूत घटक रोखे बाजारासाठी एक रचनात्मक दृष्टीकोन प्रदान करत आहेत.
संपूर्ण अहवाल https://www.kotakmf.com/documents/Annual-Outlook-2026 या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
Comments are closed.