नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
आयकर विभागाने अलीकडे दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट अभिनेता अक्षय कुमार हा गेल्या वर्षभरात म्हणजेच 2021-22 या आर्थिक वर्षात भारतातील सर्वात मोठा करदाता होता. अक्षय कुमारने 2022 मध्ये 29.5 कोटी रुपये आयकर जमा केला होता. त्याने आपली वर्षभराची कमाई 486 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते.
अक्षय कुमारच्या कमाईचा हा आकडा आश्चर्यचकित करणारा नाही. तो बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या स्टार्समध्ये गणला जातो आणि सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. त्याशिवाय अक्षय कुमार स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आणि स्पोर्ट्स टीम चालवतो. विविध ब्रँड्स मधूनही तो भरपूर कमाई करतो. 2021 मध्ये म्हणजेच 2020-21 या वर्षासाठी त्यांनी 25.5 कोटी रुपये आयकर जमा केला होता. त्या वर्षी तो देशातील सर्वात मोठा करदाता होता. त्यासाठी अक्षय कुमारला ‘सन्मान पत्र’ पुरस्कार देण्यात आला.