NGN News
Latest Marathi News

के के वाघ आणि नांदी फाउंडेशनतर्फे महिंद्रा प्राईड कार्यशाळा आयोजन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

 के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभाग व नांदी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने  अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आठ दिवसांचे महिंद्रा प्राईड सॉफ्ट स्किल ट्रेनिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ३५० हून अधिक विद्यार्थिनींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

नांदी फाउंडेशनतर्फे के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात महिंद्रा प्राईड सॉफ्ट स्किल प्रशिक्षण तिसऱ्यांदा पार पडली. तसेच बिमला सक्सेना, मेघना दुबे, हिमानी सावंत, भूपाली देवरे, मनीषा धोपेश्वरकर या अनुभवी प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्ये, मुलाखतीसाठी तयारी, व रिझ्युमे लेखन अशा महत्त्वाच्या बाबींचा समावेश होता.

महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी सी.व्ही. रायटिंग वर्कशॉप, अ‍ॅप्टिट्यूड मॉक टेस्ट्स, मॉक इंटरव्ह्यू, सीईओ कनेक्ट व टीपीओ कनेक्ट यांसारख्या उपयुक्त उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढून, त्यांना उद्योगजगतातील संधींसाठी सक्षम केले आहे. अशी माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. प्रमोद शहाबादकर यांनी दिली.

कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष मा. समीर बाळासाहेब वाघ, विश्वस्त मंडळ, सचिव प्रा. के. एस. बंदी व प्राचार्य डाॅ. के. एन. नांदूरकर यांनी नांदी फाउंडेशन आणि  महिंद्रा प्राईडचे विशेष आभार मानले.

Comments are closed.