नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी चिंतामणी लॉन्स ,गंगापूर रोड येथे दिमाखात पार पडला. नूतन अध्यक्ष किशोर काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यावेळी पदभार स्वीकारला.
फाउंडेशनचे संस्थापक आय.पी.एस. हरीशजी बैजल सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला, बैजल सरांनी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन चा झेंडा नूतन अध्यक्ष किशोर काळे यांच्या हाती दिला व कार्यकारणीची घोषणा केली. उपाध्यक्षपदी अरुण पवार, डॉ. मनिषा रौंदळ, सचिव संजय पवार ,संचालक दीपक भोसले ,बजरंग कहाटे यांची निवड करण्यात आली.
मावळते अध्यक्ष किशोर माने यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष किशोर काळे यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. आपल्या काळात झालेल्या कार्याचा लेखाजोखा त्यांनी मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश लोखंडे यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी माजी पोलीस उपयुक्त वसंत मोरे, डॉ. महेंद्र महाजन, छाया बैजल, माजी अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, फाउंडर मेंबर राजेंद्र फड, श्रीकांत जोशी, संदीप जाधव, नंदू देसाई हे उपस्थित होते.
या कार्यक्रमास नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नवीन टीमला शुभेच्छा देण्यासाठी खास करून सिन्नर, मालेगाव , देवळा ,बागलाण सायकलिस्टस ग्रुप उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी गडाख यांनी केले. आभार प्रदर्शन नूतन उपाध्यक्ष अरुण पवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली