** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : पंचवटी परिसरातील महाराणी जिंद कौर जी स्मारक स्थळ, गंगा घाट येथे शनिवारी ( दि. ७ ) पहिला भव्य कीर्तन समागम मोठ्या श्रद्धा व उत्साहात संपन्न झाला. या पवित्र कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने साध संगत उपस्थित होती. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी श्री सुखमनी साहिब जी यांच्या पवित्र पाठाने झाली. त्यानंतर सुप्रसिद्ध रागी भाई बलदेव सिंह जी वडाला यांनी गुरबाणी कीर्तन सादर केले. उपस्थित संगतने अत्यंत भक्तिभावाने कीर्तनाचा आनंद घेतला.
कार्यक्रमानंतर उपस्थित संगतसाठी गुरु का अटूट लंगर आयोजित करण्यात आला होता. या समागमासाठी मनमाड, नाशिक, लासलगाव, चांदवड, धुळे, मालेगाव, सटाणा, पिंपळगाव, ओझर, शाहापूर, येवला, कोपरगाव, संगमनेर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, उल्हासनगर, कल्याण, मुंबई तसेच आसपासच्या भागांमधून मोठ्या संख्येने संगत उपस्थित होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नाशिक डिस्ट्रिक्ट युनायटेड गुरुद्वारा कमिटी तसेच जथेदार बाबा रंजीत सिंह जी यांनी सर्व संगत आणि सेवादारांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच कार्यक्रमाच्या वेळी स्वच्छता, व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणासाठी सहकार्य केलेल्या नाशिक महानगरपालिका आणि नाशिक पोलीस प्रशासनाचे विशेष आभार मानण्यात आले
Comments are closed.