मुंबई/एनजीएन नेटवर्क
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या ‘जवान’ या चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरु झाली आहे. अशात आता अनेक चाहते जे चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या सगळ्यात सोशल मीडियावर शाहरुख अनेक चाहत्यांशी संपर्क साधताना दिसतो. अशात सोशल मीडियावर शाहरुखने नाशिककरांचे आभार मानले आहे.
सध्या जगभरातील त्याच्या चाहत्यांनी ‘जवान’ चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग करायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी तर त्याचे फॅन क्लब आहेत. या फॅन क्लबकडून ग्रुप बुकिंग करण्यात येत आहे. त्याच्या नाशिकमधल्या एका फॅन क्लबने असेच ग्रुपसाठी अॅडव्हान्स बुकिंग केले आणि त्याचा स्क्रिन शॉट शेअर करत शाहरुखला टॅग केले. शाहरुखनंही चाहत्यांचे प्रेम पाहून नाशिककरांचे आभार असल्याचे म्हटले आहे. शाहरुखने एक्स अकाऊंटवरून (पूर्वीचे ट्विटर) नाशिककरांचे आभार मानले आहेत. त्याचे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे.