NGN News
Latest Marathi News

अशोक खरात प्रकरणातील नीरज जाधवला बेड्या; मोठे खुलासे शक्य

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांचे लांगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या नवनवीन करामती आता बाहेर येवू लागल्या आहेत. अशातच खरातचे बिंग फोडणाऱ्या नीरज जाधव अखेरीस पोलिसांच्या हाती लागली आहे. नाशिकमधून नीरज जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नीरजच्या चौकशीतून खरातची कुंडली आता समोर येण्याची शक्यता आहे.

भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पण, त्यांचे हे काळे कृत्य त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नीरज जाधव या तरुणाने खरात याचे व्हिडीओ बाहेर आणल्याचा संशय आहे. अखेरीस  कॅप्टन खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात आला आहे. नीरज जाधव याने स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शरण आला होता. त्यानंतर आता नाशिक क्राईम पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीला तिचे मॉर्फ केलेल्या व्हिडीओचे स्क्रीनशॉट्स पाठविल्या प्रकरणी नीरज जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खरात प्रकरणात गेल्या दोन दिवसांपासून नीरज जाधवची चौकशी केली जात होती. अशोक खरात प्रकरणात अजून काही माहिती नीरज जाधव याच्याकडून मिळते का यासाठी पोलीस प्रयत्नशील होते. अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याचे धागे नीरज जाधवपर्यंत पोहोचले होते. 

Comments are closed.