** एनजीएन नेटवर्क
घर म्हटलं की भांडय़ाला भांडं हे लागणारच. कुटूंब म्हटलं की, अनेक नाती जोपासावी लागतात.. व्यक्ती तितक्या प्रकृती असतातचं. प्रत्येकाचे मतं, स्वभाव व वागण्याच्या पध्दती भिन्न असतात त्यामुळे घरात रूसवे ,फुगवे हे येतातच म्हणून दिर्घकाळ राग धरून अबोल राहणं हा पर्याय नाही. नाती ही अत्यंत नाजूक असतात. ताणली तर तुटणारच.. परंतु पुन्हा जोडण्यासाठी मोठे मन व सामंजस्यवृत्ती हवी.
मन मोठे असले की सारे काही सामावून घेता येते, हे वाक्य बऱ्यादा ऐकण्यात येते. त्यानुसारच वर्तन ठेवावे. घरात कुढत ,भांडत बसण्यापेक्षा मनमोकळे सर्वांशी संवाद साधला पाहिजे…चुकलो तर लगेच क्षमा मागून तशी चुक परत होणार नाही ही शाश्वती द्यावी.. चुका झाल्यात तर मोठ्या मनाने माफीही मागा. वाद होताना रागावर नियंत्रण हवे. दोन्ही बाजूने विचार करून त्यावर तोडगा काढला पाहिजे. माफ करण्या सारखे मोठे मन असले नात्यात गोडवा टिकून राहील. नाती खूप सुंदर असतात फक्त नीट जोपासता आली पाहिजे. पती पत्नीचे सातत्याने होणारे भांडणं जर विकोपाला गेलेंत तर मात्र संसार उद्धवस्त होतोचं .शिवाय घरातील सदस्यांच्या भावना दुखावल्या जातात व लहान मुलांच्या मनावर परिणामी मोठा परिणाम व आघात होतोच ते निराळे. आजच्या शिक्षण प्रणालीत सर्वच आपलेच म्हणणे खरे करतायं , चुक स्वीकारून सामंजस्यवृत्तीने सहजीवनाचे नाते प्रेमळतेने, आपुलकीने, एकोप्याने घट्ट टिकवून ठेवणे तितकेच गरजेचे आहे.. जेणेकरून नात्यांत एकोपा निर्माण राहील व नातेसंबंध टिकतील .. आजची काही नातीगोती फक्त नावापुरती राहिली आहे. अत्यंत पोकळ झाली आहेत .. वरवर फक्त नाती टिकवले जाते. मनातून एकमेकांविषयी प्रचंड राग, मनस्ताप, संताप, कटुता दिसते . फक्त निभवायची, जपायची, टिकवायची एवढाच हेतू दिसतो . नात्यांत एकदा का दरार , तडा निर्माण झाला तर ती नाती पुर्ववत सारखी बहरत नाहींत . तुटलेली मनं पुन्हा तितक्याच आपुलकीने नाही जोडली जात . तोच आदरभाव, सन्मान नाही दिसत .
मनातील किल्मिषता वागण्यात, कृतीत दिसते. मनातील सल कायम द्वेष रूपी भावनाच निर्माण करते .. जसे की तुटलेल्या वस्तुंना जोडले तरी तडा दिसतोचं .. मग मनावर आघात झाल्यास त्याच प्रेमळ नात्यांच्या गोतावळ्यात प्रेमापेक्षा तेढ जास्त दिसते ., दुरावा दिसतो .. नाती जपण्यापेक्षा मनं जपणं अत्यंत कठीण आहे. अशक्य देखील नाही मात्र दोन्हीकडून सामंजस्य वागणे आवश्यक असते.. आपल्या चांगुलपणाने आपण आपली अनेक नाती मोठ्या जिव्हाळ्याने जपून ठेवतो , टिकवून ठेवण्यासाठी तसे मोठ्या मनाने कायम कृतीशील राहतो मात्र काही नाती ही जास्त चांगुलपणाने हातातून निसटून जातात. परिणामी आपल्याच मनाला पिडा होते , त्रास होतो .. परिणामी नात्यांवरील विश्वास उडतो , भावना दुखावल्या गेल्याने मन अस्थिर व शांत राहते. यासाठीच नात्यांतील नाजूकता जपा..
- स्नेहा शिंपी
नाशिक
९८५०९६३४९९