सटाणा/विशेष प्रतिनिधी
येथील आदिवासी विकास विभाग अंतर्गत चालवली जाणारी एकलव्य रेसिडेन्सी स्कूल आज आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे चर्चेत आहे. शासनाचा हा स्तुत्य उपक्रम यामुळे होणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना फायदा नक्कीच महत्त्वाचा आहे. तळागाळातील विद्यार्थी उच्च पदापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत केलेली तरतूद आणि शासनाच्या माध्यमातून होणारे उपाय योजना यामुळे नक्कीच सर्व विद्यार्थ्यांचा फायदा होत आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी चांगलं शिक्षण घेऊन पुढे देशाचे नाव मोठे करावे आणि एकलव्य रेसिडेन्सी स्कूल अजमेर सौंदाणे चा झेंडा सतत उंच ठेवा. शासन पातळीवरून आपल्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी मी बांधील राहील असेही आश्वासन यावेळी बोरसे यांनी केले. आज G20 या महत्त्वकांक्षी उपक्रमाचे सादरीकरण व शुभारंभ प्रसंगी आमदार दिलीप बोरसे बोलत होते.
यावेळी माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते किशोर कदम यांनी व आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी बी.एम.पाटील यांनी आपले विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी आर आर तोरणे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष विश्वास चौरे, सदस्य कांतीलाल बागुल, योग प्रशिक्षक नंदकिशोर शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यालयाचे प्राचार्य सुरेश देवरे यांनी एकलव्य रेसिडेन्सी स्कूल बद्दल माहिती देताना क्रीडा ,कला व सांस्कृतिक विभागात विद्यार्थ्यांनी मिळवले यशाबद्दल माहिती दिली. आज रोजी महाराष्ट्रात आपल्या विद्यालयाची काय प्रगती आहे याचाही आलेख मांडला. शाळेसाठी येणाऱ्या अडचणी रस्ता आणि पाणी यासाठीही आमदार दिलीप बोरसे यांना साकडे घातले. आज रोजी भारत 21 देशांचे नेतृत्व करीत आहे, त्या धर्तीवर रोल मॉडेल म्हणून एकलव्य रेसिडेन्सी स्कूल यांनी 21 देशाचे प्रतिनिधी आणि त्या प्रतिनिधींचा प्रमुख म्हणून मॉडेल तयार केले आहे त्या मॉडेल चे सादरीकरण मान्यवरांच्या समोर घेताना खूप आनंद होत आहे असेही त्यांनी म्हटले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभारी प्राचार्य अनिल मंगळे, शिंदे दिगर, श्री निलेश कुलकर्णी,श्री नारायण चौधरी, श्री राजू गोळेसर, श्री संतोष जगताप,श्री गणेश गायसमुद्रे, श्री युसुफखान पठाण, श्री केशव सोनवणे,श्री प्रशांत आहेर, श्रीमती सारिका घाडगे, श्रीमती वैशाली ताठे, श्रीमती शीतल जाधव,श्रीमती दीपाली पगार, श्रीमती संगीता मोरे, कु प्रियांका राठोड,श्री सुरेश पवार, श्री विकास पवार, रोहित पवार, रवींद्र बोराड आदींनी प्रयत्न केले.