** एनजीएन नेटवर्क
सृष्टीचे गीत
पसरूनी पदर भू
काय शब्दची पेरते
केशरांच्या ओठांवर
गाणे हिरवे म्हणते
निजलेल्या प्रहरात
गुढ हसते गहिरे
मनोरम्य लोचनांचे
मुग्ध विभ्रम साजरे
वस्त्र तलम केशरी
ॠजूतेने सावरते
तरी अनावर वेडे
जळी झणी घसरते
नित्य नव्या आवेगांचे
सत्य शाश्वत सृष्टीचे
तत्व केशरी तेजाचे
पायरव घुंगराचे
क्षितिजाच्या मौनातूनी
काय भिनते चित्तात
सळसळ अंतःस्थांची
ओथंबते हृदयात
- कविता शिंगणे-गायधनी
७५८८१८१५००