रंग घेऊन हिरवे
संसाराची ठेवू नीव
दोन क्षण सावलीचे
घेते आकारत्व शिव
चक्र सृष्टीचे अनोखे
नको गुंतणे पाखरा
जरी अंडज आजचे
भिडे भविष्य भास्करा
रुजे वात्सल्य साजरे
ओल काळजात वेडी
जिव्हाळ्याने जोजविणे
नको वेढू माय बेडी
भान तीक्ष्ण रक्षणाचे
उरी सदा ओसंडते
जन्मवेळ संचिताची
आस लोचनी दाटते
अर्थ शुभ्र कळो आले
रूप संगाचे देखणे
तोलू प्रपंच पारडे
जपू अस्तित्व चांदणे
कविता शिंगणे गायधनी
7588181500