** एनजीएन नेटवर्क
सय तुझी वेडी मनी
अशी आतून धावते
भिजे स्पंदन आवेगी
मूर्त लोचनी दिसते
जन्म तुझ्यात रुजला
चित्त तुझ्यात रमते
तुझ्या नावाचे गोंदण
असे रक्तात वाहते
गंध वारे वाहतात
कळ्या होती नवनीत
रिमझिम करतात
ऋतू ओले ओंजळीत
येई फिरून फिरून
मुग्ध तुझ्या आभाळाची
अशी कोमल सुखाची
सय अत्तर क्षणांची
कविता शिंगणे गायधनी
7588181500