** एनजीएन नेटवर्क
पाऊस कितीही
सुखावह असला तरी…
प्रत्येक पावसाळ्यात …
इंद्रधनू दिसतच असं नाही ..
नाही का….
कधीतरी ….
एखाद्याच वेळेस दिसते….
एक क्षणभरच दिसते …..
आणि पुन्हा हरवून जाते …..
तशाच पागोळ्या पण…..
पागोळ्यांची मजाच काही वेगळी असते …
.टप टप पडणाऱ्या पागोळ्या बघितल्या ना….
की मन कसे अलवार होऊन जाते…..
पण एकदा जोराचा पाऊस सुरू झाला ….
की त्या पागोळ्यांमधली मजाच निघून जाते….
त्या तेवढ्या आनंद देत नाहीत……
*धाराच व्हायला लागतात त्याच्या*….
मी हे का बोलते ना सगळं……
तुझी माझी पहिली भेट अशीच होती का….
खुप आठवून बघते ……*
पण सारं धुसर धुसर दिसतंय*…
.दिसेनासेच म्हण ना…..
क्षणभर दिसलेल्या इंद्रधनूसारखी….
टप टप पडणाऱ्या पागोळ्यांसारखी…..
काय घडले होते रे तेव्हा…..
तुला आठवेल का….
आताही…..मीच माझ्या झुळझुळत्या केसांवरून …
.हात फिरवताना लख्ख वीज चमकून गेली….*
सारं धुसर धुसर आठवतंय*….
*तेव्हाही विज चमकलीच होती का*….?
- कविता शिंगणे गायधनी