** एनजीएन नेटवर्क
पुन्हा पुन्हा अलवार
अनिवार छंद तुझे
थेंब थेंब एक कसे
चिंब घना दान तुझे
टपटप निथळते
लेणे सरींचे हासते
पानांतुनी अमृताचे
झरे शांतसे वाहते
वेणू पैलतीरी वाजे
देही निळेपण रुजे
वळणावरी गंध
मारव्याचा असा सजे
ओल काळजाची ओल्या
झेपावत येते ओली
मुसमुसते माती
सुख ओले मुळां खाली
माया थेंबांची लाजरी
अशी भवरून येते
विवरात नेणिवांच्या
पान्हे श्रावणाचे देते
कविता शिंगणे-गायधनी
7588181500