** एनजीएन नेटवर्क
शेला शालीन मनाचा
हिरवाई लेवविला
शुभ भाव हृदयाचा
पिसा सम तरंगला
नवा अर्थ जगण्याचा
कासावीस तरी मनी
शुभ्र ऊन भविष्याचे
शंका असंख्य जीवनी
हेलकावतो गोंडा
खुळ्या स्वप्नांचा चित्तात
भय गाठींचे पडते
येती भरून श्वासात
रंग मनस्वी कोवळे
क्षणभर दाटतात
जबाबदारींचे थेंब
हाक मनी घालतात
ओळखीचे व्हावेस तू
स्निग्ध भाव मनातला
भिस्त देखण्या स्वप्नांची
जन्म तुझ्यात गुंतला
गोफ विणते रेशमी
यावे फुलून फलित
गुंते शकून वेढणी
सोन क्षणांचे संचित
- कविता शिंगणे-गायधनी