** एनजीएन नेटवर्क
ज्ञाना सारखे वैराग्य
अंतःस्थात लेववितो
सूप्त गंध केशराचा
हलकेच पसरतो
श्वास हळवा ओलेता
जाणिवांत हुंकारतो
क्षण जन्माचा कोवळा
अंतरंग खुलवतो
अर्थ संचिताचा सारा
खुले माझ्या मौनातूनी
शुभ प्रार्थनेचे कर
जुळतात मनातूनी
कथा एक अस्तित्वाची
लख्ख सुखराशी देतो
मातीतले मातीतुनी
वारे अत्तराचे देतो
पडताना टपटप
माती बाहू पसरते
शुभ्र पाऊस साजरा
कोण आवेगे पाहते
- कविता शिंगणे-गायधनी