NGN News
Latest Marathi News

‘कपालेश्वरचा राजा’ आदर्श गणेशोत्सव मंडळ म्हणून सन्मानित

संस्थापक अध्यक्ष शाम गोहाड यांनी स्वीकारला पुरस्कार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आदर्श गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तिचे पारितोषिक वितरण नुकतेच पार पडले. त्यानुसार, शिस्त, शिस्तबद्ध आयोजन आणि समाजभान जोपासत गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल नाशिक रोड येथील आदर्श गणेशोत्सव मंडळ म्हणून सन्मानित करण्यात आले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शाम गोहाड यांनी पुरस्कार स्वीकारला.
याप्रसंगी आमदार सरोजताई आहिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी मान्यवर उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे वेगळेपण राखत गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल आदर्श गणेशोत्सव मंडळाचा यावेळी सन्मान करण्यात आला. अध्यक्ष शाम गोहाड यांनी पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी मंडळांचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.

———————–
@ दरवर्षी गणेशोत्सव साजरा करताना एक संकल्पना डोळ्यासमोर असते. ती साकारताना सामाजिक भान ठेवण्यासोबत शिस्त, किमान खरच आणि तत्सम घटक लक्षात घेतले जातात. यावेळीही त्याचे अनुकरण करण्यात आले. म्हणूनच हा सन्मानाचा साज आमच्या कपालेश्वरच्या राजाला चढवण्यात आला. भविष्यात, वैविध्यपूर्ण उपक्रम राबण्याचा मंडळाचा मानस राहील. हा मान मिळविण्यामागे मंडळातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व कपालेश्वरच्या राजाचे सैनिक यांची एकजूट, निष्ठा, अथक परिश्रम आणि शिस्तबद्ध नियोजन हाच खरा पाया ठरला.

  • शाम प्रकाश गोहाड
    संस्थापक अध्यक्ष – कपालेश्वरचा राजा मित्र मंडळ, नाशिक रोड

Comments are closed.