नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
शहरातील रविवार कारंजा येथील श्री सिद्धीविनायक अर्थात चांदीचा गणपती येथे कलंत्री परिवाराला श्री गणेशासह खाटू श्याम यांच्या आरतीचा बहुमान देण्यात आला.
रविवार कारंजावरील चांदीचा गणपती मित्रमंडळाचा देखावा गणेशभक्तांचे आकर्षण असते. यंदा येथे खाटू श्याम मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे. रविवारी सायंकाळच्या आरतीचा मान स्व. चंद्रकांत कलंत्री यांचे पुत्र अमित कलंत्री व परिवाराला देण्यात आला. यावेळी अमोल कलंत्री, दीपा कलंत्री, रुचिता कलंत्री, आशिष कलंत्री, अपूर्वा कलंत्री, सोनाली हरकुट आदींसह नाशिकसह नाशिकरोड परिसरातील कलंत्री परिवार यावेळी उपस्थित होता. आरतीला कलंत्री परिवाराकडून नैवेद्य म्हणून २१ किलोचा सुका मेव्याचा मोदक अर्पण करण्यात आला. मोदक बनविण्यासाठी सागर सम्राटचे मालक शिवलाल चौधरी यांचे सहकार्य लाभले.
Comments are closed.