NGN News
Latest Marathi News

बागलाणचे काकुळते मोदींना म्हणाले, ‘सौर कृषी’ने विकासाची पहाट दाखवली

  • दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद
  • ४० एकर जमीन सिंचनाखाली ; दरवर्षी दोन लाख रुपये उत्पन्न वाढले

नाशिक : पीएम कुसुम सी -मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत आपली ४० एकर जमीन सिंचनाखाली आल्याचा दावा नाशिकच्या बागलाण तालुक्यातील किकवारी येथील शेतकरी सुनील सिताराम काकुळते यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सौर ऊर्जा प्रकल्पातील विविध लाभार्थी शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यामध्ये काकुळते यांचा समावेश होता.

दूरदृश्य प्रणाली द्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातील २,४५८ मेगावॅट क्षमतेच्या ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी, राज्यातील पी एम  कुसुम सी – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० आणि पी एम कुसुम सी बी – मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.  यावेळी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील अनेक लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला. काकुळते यांनी, आपली ४० एकर जमीन सिंचनाखाली आल्यामुळे दरवर्षी दोन लाख रुपये उत्पन्न वाढले तसेच ५० ते ६० लोकांना यामुळे रोजगार प्राप्त  झाला , अशी माहितीही प्रधानमंत्री मोदी यांना दिली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाकवड येथील चंदू पावरा या शेतकऱ्याने पीएम कुसुम बी- मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ७.५ एचपी क्षमतेचा सौर कृषी पंप बसवला. त्यामुळे दिवसा वीज उपलब्ध होऊन पाण्याच्या उपलब्धतेमुळे मका, गहू, भुईमूग या पिकांची पेरणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

@ सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीला दिवसा वीज उपलब्ध होत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट होत आहे.  मात्र शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीवर भर देऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या पीक पद्धतीचा वापर करावा. शेतीचे आरोग्य संवर्धन उपाय होणे ही काळाची गरज आहे.. या  सौर ऊर्जा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. आता शेतकऱ्यांनी केमिकलमुक्त शेती करण्यावर भर दिला पाहिजे. झिरो कॉस्ट फार्मिंगला देखील महत्त्व दिले पाहिजे.

  • नरेंद्र मोदी, प्रधानमंत्री

Comments are closed.