NGN News
Latest Marathi News

के के वाघ तर्फे उद्या ‘ भावमधुर स्वरांचा- मोगरा फुलणार’

  • बाळासाहेब (भाऊ) वाघ स्मृती व्याख्यानमाले अंतर्गत २१ वे पुष्प ; गणेश शिंदे व सन्मिता धापटे-शिंदे यांचा संगीतमय कार्यक्रम

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

 के के वाघ शिक्षण संस्था संचलित, के. के. वाघ औषानिर्माणशास्त्र महाविद्यालय नाशिक, के के वाघ  इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पिंपळस ता. निफाड आणि के के वाघ शिक्षणशास्त्र  महाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने के के  वाघ शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कै. बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ  यांच्या स्मृती प्रित्यर्थ शनिवार ( दि. २९ ) रोजी सायं.  ४ वाजता  के. के. वाघ  इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,   पिंपळस ता. निफाड  येथे २१ वे पुष्प  गुंफण्यात येणार आहे.

सुप्रसिद्ध प्रबोधनकार गणेश शिंदे व सुप्रसिद्ध गायिका सन्मिता  धापटे – शिंदे हे “ भावमधुर स्वरांचा – मोगरा फुलला “ या विषयावर संगीतमय पुष्प गुंफणार आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शास्रीय गायक व संगीतकार नरेंद्र टोंगळे हे भुषविणार आहेत. 

Comments are closed.