NGN News
Latest Marathi News

के के वाघ पॉलिटेक्निकला ‘इंजिनियरिंग एज्युकेशन एक्सलन्स’ पुरस्कार

  • दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) तर्फे सन्मान

नाशिक – के के वाघ शिक्षण संस्था संचलित के के वाघ पॉलिटेक्निक, नाशिक या संस्थेस दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) अर्थात आयईआय या देशातील नामांकित व प्रतिष्ठित व्यावसायिक संस्थेकडून “इंजिनियरिंग एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड – २०२५’ हा मानाचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एन.आय. टी दुर्गापूर, पश्चिम बंगाल येथे झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात  प्राचार्य प्रा. पी टी कडवे यांनी पुरस्कार स्वीकारला.

अभियांत्रिकी शिक्षणातील गुणवत्ता, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, उद्योगाभिमुख शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, कौशल्य आधारित शिक्षण तसेच सामाजिक जबाबदारी यांसारख्या विविध निकषांच्या आधारे देशभरातील निवडक अभियांत्रिकी शिक्षण संस्थांची निवड करण्यात येते. या कठोर मूल्यांकन प्रक्रियेत के के वाघ पॉलिटेक्निक, नाशिक ने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.  त्यामुळे हा सन्मान प्राप्त झाला असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ यांनी केले.

विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, परिणामावर आधारित शिक्षण,  व्यक्तिमत्व व उद्योग आधारित कौशल्ये  यावर आमचा विशेष भर असून भविष्यात आम्ही दर्जेदार अभियंते घडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्राचार्य प्रा. पी टी कडवे यांनी सांगितले.  या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, संचालक मंडळ, जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी यांनी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले. 

Comments are closed.