नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
नवी दिल्लीत एका ज्वेलर्समध्ये कोट्यवधींची चोरी झाली आहे. शोरूम मालकाने पोलीस तक्रारीत म्हटल्याप्रमाणे त्याच्या शोरूममधून तब्बल २० ते २५ कोटी रुपयांच्या सोन्याच्या आणि हिरेजडीत दागिन्यांची चोरी झाली आहे. हे शोरूम दिल्लीतल्या जंगपुरा परिसरात असून उमराव सिंह ज्वेलर्स असं या शोरूमचं नाव आहे. सोमवारी शोरूम बंद असताना चोरांनी शोरूमच्या भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला आणि शोरूममधील कोट्यवधी रुपयांचे दागिने पळवले.
दिल्लीतल्या जंगपुरा येथील बाजार सोमवारी बंद असतो. परिसरातील जवळपास सर्वच दुकानांना सोमवारी कुलूप असतं. शोरूम मालक आणि कर्मचाऱ्यांनी रविवारी (२४ सप्टेंबर) रात्री शोरूम व्यवस्थित बंद केलं होतं. परंतु, मगंळवारी सकाळी शोरूमचे मालक आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शोरूम उघडलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. शोरूममध्ये तब्बल २० ते २५ कोटी रुपयांचे दागिने होते. शोरूममध्ये ठेवलेले सगळे दागिने चोरांनी लंपास केले