NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

जोधपूरच्या अरबाजचा पाकच्या अमीनाशी निकाह; व्हिडीओ कॉन्फरन्सिंग..

0

जयपूर/एनजीएन नेटवर्क

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची चर्चा सुरु असतानाच आता आणखी एक प्रकरण चर्चेत आले आहे. पण यामध्ये पाकिस्तानी तरुणीने सीमा ओलांडली नसून, तिथे त्यांच्या देशातूनच भारतीय तरुणाशी लग्नगाठ बांधली आहे. राजस्थानच्या जोधपूर येथे राहणाऱ्या अरबाजने पाकिस्तानच्या अमीनाशी लग्न केले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हे दोघे विवाहबंधनात अडकले. यावेळी भारत आणि पाकिस्तानात बसलेल्या काझींनी हे लग्न लावून दिले. 

या लग्नाला दोघांचेही नातेवाईक उपस्थित होते. नातेवाईकांसाठी यावेळी लग्नमंडपात एलईडी लावण्यात आले होते. आता व्हिसा मिळाल्यानंतर नवरीमुलगी भारतात येणार आहे. अरबाजचे वडील मोहम्मद अफजल हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. अरबाज हा त्यांचा लहान मुलगा आहे. या लग्नासंबंधी बोलताना त्यांनी संगितलं की, दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव असला, तरी नाती तयार होण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही. निकाह झाला असून आता आम्ही लवकरच व्हिसासाठी अर्ज करणार आहोत. व्हिसा मिळाल्यानंतर नवरीमुलगी पाकिस्तानातून या घरी येईल. या लग्नामुळे आमचं संपूर्ण कुटुंब आनंदी आहे.

नवरीचे थाटामाटात स्वागत होणार

अफजल म्हणाले, आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबांसाठी ऑनलाइन निकाह होणे फार चांगली बाब आहे. यामुळे खर्च कमी होतो आणि लग्नही व्यवस्थित पार पडते. अफजल म्हणाले की, माझ्या लहान मुलाच्या सासरचे लोक फार सामान्य कुटुंबातील आहेत. या लग्नात त्यांचा जास्त पैसा खर्च झाला नाही. आता जेव्हा नवरीमुलगी येईल तेव्हा आम्ही अत्यंत थाटामाटात तिचे स्वागत करु.  मोहम्मद अफजल यांचा लहान मुलगा वकिलीसह व्हिडीओ एडिटिंगचं काम करतो. मोहम्मद अरबाजने हे लग्न कुटुंबाने ठरवलं असल्याची माहिती दिली आहे. नातेवाईकांनी हे स्थळ शोधलं आणि त्यानंतर हे लग्न ठरलं असं त्याने सांगितलं आहे. सध्या व्हिसा मिळत नसल्याने, आम्ही ऑनलाइन लग्नाचा पर्याय निवडला. 

Leave A Reply

Your email address will not be published.