NGN News
Latest Marathi News

झुलेलाल पतसंस्थेतर्फे ठेवीदारांना तीन हजार रुपये वाटप सुरू : चावला

२७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत; नाशिक शहरात शाखा उघडण्याचा मानस व्यक्त

नाशिक रोड : एनजीएन न्यूज नेटवर्क

येथील झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी ( दि. ३० ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील पतसंस्थेत पतसंस्थेचे अध्यक्ष रतन चावला यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत विविध विषय सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले. ज्या सभासदांची रक्कम थकलेली आहे त्यांनी लवकरात लवकर के.वाय.सी करून आपली थकीत रक्कम पैकी तीन हजार रुपये घेऊन जावी, असे आवाहन अध्यक्ष रतन चावला यांनी यावेळी केले.

मागील वर्षी झालेल्या सभेचा ताळेबंद यावेळी वाचून दाखविण्यात आला. चालू वर्षीच्या बैठकीत नवे विषय मांडण्यात येऊन विविध विषय सर्व संमतीने मंजूर करण्यात आले. नवे ठेवीदार, जुनी थकीत कर्ज वसुली, ठेवीदारांची थकीत रक्कम देणे आदी आव्हानांना सामोरे जात तीन हजार रुपये रक्कम परत करण्यास पतसंस्थेने सुरुवात केली आहे. नव्या संचालक मंडळाने पतसंस्थेत नव्या ठेवी आणून दीड लाखांपर्यंत चे नवे कर्ज प्रकरणे सुरू करून त्यातून होणारे नफा आणि जूने कर्ज प्रकरणांमधून होणारी वसुली मिळून ठेवीदारांची थकीत रक्कम पुन्हा देण्यास सुरुवात केली आहे.  लवकरच पाच लाखांपर्यंत कर्ज वाटप करण्यास सुरुवात करणार येणार आहे. एकेकाळी १०० कोटींची पतसंस्था असलेली झुलेलाल पतसंस्था डबघाईस आल्यानंतर ठेवीदारांना सर्व रक्कम परत करून पुन्हा उभारी घेणारी ही एकमेव पतसंस्था असेल. व्यवस्थापक रमेश जाधव यांनी एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 पर्यंत वार्षिक ताळेबंद हिशोब संचालक आणि उपस्थितांपुढे मांडला. ज्या सभासदांची रक्कम थकलेली आहे त्यांनी लवकरात लवकर के.वाय.सी करून आपली थकीत रक्कम पैकी तीन हजार रुपये घेऊन जावी असे आवाहन अध्यक्ष रतन चावला यांनी केले आहे.

यावेळी उपाध्यक्ष हरीश देवानी, हेमंत वजीरानी, संचालक मंडळातील रितिका कलानी, डॉक्टर कांचन लोकवानी, गोपाल सचदेव, हेमंत पमनानी, भगवान मोटवानी, कन्हैयालाल माखिजा, कन्हैयालाला कलानी, महेश बनसिंगानी, संस्थेचे सनदी लेखापाल प्रकाश कलवानी सह जयकिशन कृष्णानी, जयराम चावला, सेवकराम दर्डा, मनोहर कृष्णांनी, बाबुलाल कृष्णानी आदी सभासद उपस्थित होते. सविता जोशी, पंकजा जोशी, कल्पना टिळे, संजय टिगोट तसेच अल्पबचत प्रतिनिधी पतसंस्थेत निर्विघ्नपणे सेवा देत असून लवकरच नाशिक शहरात शाखा उघडण्याचा मानस अध्यक्ष रतन चावला यांनी व्यक्त केला.

Comments are closed.