मुंबई/एनजीएन नेटवर्क
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मुंबई कार्यालयात दिवसभर झालेल्या चौकशीनंतर रात्री उशिरा ‘ईडी’ने ‘गोयल यांना अटक केली आहे. कॅनरा बँकेची ५३८ कोटींना फसवणूक केल्याप्रकरणी गोयल यांची चौकशी केली जात होती. याच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.
जुलै महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि इतरांविरुद्ध नव्याने आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी या प्रकरणी मुंबई आणि दिल्लीतील सुमारे आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. छापेमारीच्या या कारवाई दरम्यान ईडीने काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली होती. आता नरेश गोयल यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली.
‘