NGN News
Latest Marathi News

जय बाबाजी परिवार नवीन वर्षाचा शुभारंभ दणक्यात करणार

  • नाशिक जिल्ह्यातून हजारो भाविक सहभागी होणार
  • अमावस्या व गुढीपाडवा निमित्त वेरूळ येथे संकल्प सोहळ्याचे आयोजन…

** अमर आढाव

ओझर : एनजीएन न्यूज नेटवर्क

भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिंदू नववर्षाची सुरुवात होत असल्याने जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचा शुभारंभ जोरदार व लक्षवेधी स्वरूपात करणार आहे. अमावस्या व गुढीपाडवा या निमित्ताने भक्तांसाठी विशेष संकल्प सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यात राज्यभरातील विविध जिल्ह्यातून हजारो भाविक सहभागी होणार आहेत.

निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज धर्मपीठाचे पिठाधीश्वर अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने जय बाबाजी भक्त परिवाराचे गेल्या अनेक वर्षांपासून देव,देश,धर्मासाठी अखंडित कार्य सुरू आहे.भारतीय संस्कृती व धर्म रक्षणार्थ आजतागायत भक्त परिवाराने विविध भव्य दिव्य सोहळे संपन्न केले आहेत.याही वर्षी सरत्या वर्षाला निरोप व नवीन हिंदू वर्षाचे स्वागत वेरूळ आश्रमात मोठ्या जल्लोषात व लक्षवेधी स्वरूपात करण्यात येणार आहे.आश्रम परिसरात सर्वत्र भगवे ध्वज,आकर्षक सजावट, पुष्पवृष्टी,ढोल ताश्याच्या गजर,फटाक्यांची आतिषबाजी,ठिकठिकाणी गुढी उभारण्यात येणार आहे.विशेष संकल्प,अभिषेक,सत्संग,प्रवचन यांसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ मार्च (अमावस्या) व १९ मार्च (गुढीपाडवा) या दोन दिवशी विशेष संकल्प सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी वेळेनुसार हजारो भाविक उपस्थित राहणार आहे. कार्यक्रम सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० या वेळेत संपन्न होणार आहे. चार तासांच्या कालावधीत भारतीय संस्कृती व देव,देश,धर्मासाठी विशेष मार्गदर्शन व विशेष संकल्प विधी संपन्न होणार आहे.या दिव्य सोहळ्यास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

नववर्ष विशेष संकल्प विधी..

हिंदू नववर्षाच्या विशेष संकल्प पूजा, विधी साठी येणाऱ्या भाविकांनी पूजेसाठी य आरतीचे ताट, हळद-कुंकू, अक्षता, फुले, तांब्या, छोटे ताट, आचमन पळी, सुपारी व आसन आदी पूजेचे साहित्य सोबत आणावे, असेही आवाहनही करण्यात आले आहे.

Comments are closed.