NGN News
Latest Marathi News

जळगावच्या तरुणीचा हिमाचलमध्ये अपघाती मृत्यू; बसवर मोठा दगडी ढिगारा..

 जळगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क

मूळ जळगावच्या आणि सध्या पुण्यातील एका खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या तरुणीचा हिमाचल प्रदेशातील भीषण अपघातात अंत झाला आहे. लक्ष्मी रामचंद्र विराणी ( २४ वर्षे ) असे या तरुणीचे नाव आहे. लक्ष्मी ही शिमला येथे फिरत असताना बुधवारी अचानक दरड कोसळून तिच्या बसवर मोठा दगडी ढिगारा कोसळला. या अपघातात बसचा मोठा भाग चिरडला गेला आणि लक्ष्मीसह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.

शिमला जिल्ह्यातील रामपूर तालुक्यातील हिंदुस्तान-तिबेट मार्गावरील बिथल (कालीमिट्टी) परिसरात रविवारी ही दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे डोंगरावरुन अचानक प्रचंड दगड खाली घसरले आणि थेट खाजगी बसवर कोसळले. या भीषण अपघातात बसचा पुढचा भाग पूर्णतः चिरडला गेला. लक्ष्मी हिचा मृतदेह रामपूर उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असून नियमानुसार शवविच्छेदनानंतर तो तिच्या कार्यालयीन सहकारी तरुण रामचंदानी यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात येईल. नोकरीसाठी पुण्यात राहणारी लक्ष्मी विराणी पर्यटनासाठी हिमाचलला गेली आणि दुर्दैवाने तिला जीव गमवावा लागला. तिच्या निधनाची बातमी पसरताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.