नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेले जलज शर्मा यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. आज सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्या मुख्य दालनात पदभार स्वीकारण्याची प्रशासकीय प्रक्रिया पार पडली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितिन रहेमान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवडणूक शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भिमराज दराडे, तहसिलदार परमेश्वर कासोळे, नरेश बहिरम, नायब तहसिलदार विजय कच्छवे, विधी अधिकारी हेमंत नागरे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी औपचारिक ओळख करून संवाद साधला.