NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

अरेरे ! महामार्गावरील लोकांना जॅग्वारने चिरडले; ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

0

अहमदाबाद/एनजीएन नेटवर्क

शहरात एका भीषण अपघाताने नऊ जणांचा बळी घेतला आहे. येथील एसजी हायवेवर झालेल्या या भीषण अपघातात भरधाव जाणाऱ्या जॅग्वारने महामार्गावरील डझनभर लोकांना चिरडले. या अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. एसजी हायवेवर ट्रकने थार वाहनाला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर चालक ट्रकसह पळून गेला. अपघातानंतर महामार्गावर मोठी गर्दी झाली. त्यानंतर पाठीमागून वेगाने येणाऱ्या जॅग्वारने अपघात पाहणाऱ्या लोकांना चिरडले.

भरधाव जॅग्वॉरने गुजरातमधील अहमदबाद एसजी महामार्गावर लोकांवर धडक दिल्याने किमान नऊ जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे 1.15 च्या सुमारास थार आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातानंतर लोक तिथे उभे असताना एसजी हायवेवरील इस्कॉन ब्रिजवर ही भीषण घटना घडली. अपघात पाहत असताना एका जॅग्वार वाहनाने पुलावर उभ्या असलेल्या लोकांना अक्षरक्षः चिरडले. भरधाव वाहनाने धडक दिल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पोलीस हवालदार आणि एका होमगार्ड जवानाचाही समावेश आहे. त्याचवेळी सुमारे 9 ते 10 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटे 1.15 च्या सुमारास इस्कॉन ब्रिजवर महिंद्रा थार वाहनाने एका ट्रकला धडक दिली होती. त्या अपघातातील जखमींना वाचवण्यासाठी लोक तेथे जमले. त्यानंतर ताशी 120 किमी वेगाने एक जग्वार गाडी तेथे आली आणि तिने महामार्गावर उभ्या असलेल्या लोकांवर चिरडून नेले. या गाडीचा वेग एवढा होता की चालकाला गाडीवर अजिबात नियंत्रण ठेवता आले नाही. 

Leave A Reply

Your email address will not be published.