नाशिक : अमर आढाव
निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे पिठाधीश्वर अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी पहिल्या श्रावणी सोमवारी नांदगाव तालुक्यातील जातेगाव डोंगर येथील जागृत देवस्थान श्री पिनाकेश्वर महादेवांचे महाभिषेक पूजन केले.यावेळी आश्रमीय संत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री पिनाकेश्वर महादेव मंदिराचे महत्त्व बाबाजींच्या तपोमय जीवनाशी निगडित आहे.कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांनी अंदरसूल येथील नागेश्वर मंदिर येथे तपश्चर्या कालावधी सन १९५४ ते १९६५ पर्यंत कठोर तपस्या केली. बाबाजी रोज १८_१८ तास सिद्धासंनात तपश्चर्या करत असत. फलस्वरूप भगवान शिव शंकराने बाबाजींना साक्षात दर्शन दिले.आणि पिनाकेश्वर महादेव, अर्थात मोठा महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास प्रेरणा दिली.जगदगुरु जनार्दन स्वामी महाराजांनी आपल्या जीवन कार्यात सर्वात पहिले जातेगावच्या पिनाकेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला.येथूनच भक्त परिवाराचा कार्यारंभ झाला.यामुळेच जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने पहिल्या श्रावणी सोमवारी उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रतिवर्षी भगवान पिनाकेश्वर महादेवाचे अभिषेक पूजन करण्यात येते. याहीवर्षी ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात जगदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी महाअभिषेक पूजन केले. यावेळी आश्रमीय संत व जय बाबाजी भक्त परिवारातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.