शिर्डी/एनजीएन नेटवर्क
मला भाजप आणि काँग्रेस या पक्षांकडून निवडणूक लढण्यासंदर्भात विचारणा झाली आहे. मला भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास बारामतीमध्ये नक्कीच बदल घडून येईल, असा विश्वास भूमिका ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी येथे व्यक्त केला. सुप्रिया सुळे या जर भाजपच्या उमेदवार झाल्या, तरीदेखील मी विरोधात निवडणूक लढेन, असा दावा देसाई यांनी केला.
साई म्हणाल्या, सुप्रिया सुळे तीन वेळा बारामतीतून खासदार झाल्या आहेत. यावेळी मला वाटले होत राष्ट्रवादी काँग्रेस एखाद्या कार्यकर्त्याला बारामतीतून संधी देईल. मात्र सुप्रिया सुळे स्वतःच तयारी करता आहेत. त्यांच्या मतदार संघात अनेक कामे झालेली नाहीत. लोकांना त्याचे नेतृत्व मान्य नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात मी बारामतीतून लोकसभा लढवणार असा दावा देसाई यांनी केला.