नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
माहिती तंत्रज्ञान कंपन्या २६ नव्या शहरांमध्ये विस्तारणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील २ शहरांचा समावेश आहे, असे NASSCOM-Deloway India अहवालात म्हटले आहे. पायाभूत सुविधांचा विकास, कौशल्ये, स्टार्टअप इकोसिस्टीम आणि सरकारी पुढाकारांमुळे विस्तारात चाललेली २६ टियर २ शहरे तंत्रज्ञान हब बनण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये चंदीगड, जयपूर, लखनऊ, भोपाळ, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, विजयवाडा, मदुराई, त्रिची, कोईम्बतूर, म्हैसूर आणि कोची, दिल्ली, मुंबई, पुणे या शहरांचा समावेश आहे.
टियर २ शहरांमधील कौशल्यावरील खर्च प्रस्थापित IT हबच्या तुलनेत सुमारे २५ ते ३० टक्के कमी आहे. प्रस्थापित आयटी हबच्या तुलनेत नवीन शहरांमध्ये रिअल इस्टेट भाड्यात ५० टक्के बचतदेखील आहे. खर्च बचतीसह ही उदयोन्मुख टियर २ शहरे जागतिक डिजिटल टॅलेंट हब म्हणून भारताच्या वाढीस हातभार लावण्यासाठी सुस्थितीत आहेत. सध्या भारतातील ११ टक्के ते १५ टक्के टेक टॅलेंट टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये राहतात आणि कामाच्या विकेंद्रीकरणामुळे उदयोन्मुख शहरांमधील लोकांसाठी अनेक नवीन संधी उघडल्या जात आहेत, असे अहवालात म्हटले आहे. अभियांत्रिकी, कला आणि विज्ञान शाखेतील भारतातील ६० टक्के पदवीधर हे छोट्या शहरांमध्ये आहेत, असे अहवालात म्हटले आहे.