NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

वूमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग : ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप

0

नाशिक : महिला क्रिकेट मधील कामगिरीची आंनदाची बातमी. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे पुणे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर ४ ते १४ जून दरम्यान झालेल्या वूमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग – डब्लू एम पी एल – स्पर्धेत नाशिकची खेळाडू ईश्वरी सावकारने सर्वाधिक धावा फटकावत उत्कृष्ट फलंदाजी साठीच्या ऑरेंज कॅपचा बहुमान मिळवला.

वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग मधील सोलापूर स्मॅशर्स या संघातर्फे सलामीला खेळताना ईश्वरीने सात डावांत ४४.८३ च्या सरासरीने १०९.३५ च्या स्ट्राईक रेटने एकूण २६९ धावा फटकावल्या. अंतिम फेरीत देखील धावबाद होण्याआधी तिने २० चेंडूत २२ धावांचे योगदान दिले. त्यानंतर नाशिकच्याच शाल्मली क्षत्रियनेही २३ चेंडूत ३४ धावा फटकावल्या. पण चुरशीच्या लढतीत पुणे वॉरिअर्स विरुद्ध जिंकण्यासाठी १३० धावांचा पाठलाग करताना सोलापूर स्मॅशर्सला १ धाव कमी पडली. त्याबरोबरच नाशिकच्या प्रियंका घोडकेने गोलंदाजीत चमक दाखवत रत्नागिरी जेट्स या संघातर्फे ६ डावांत १० बळी घेत स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले.

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकार,रसिका शिंदे , प्रियंका घोडके, शाल्मली क्षत्रिय ,तेजस्विनी बाटवाल व ऐश्वर्या वाघ या सहा खेळाडूंची या पहिल्याच वूमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग – डब्लू एम पी एल – स्पर्धेत आय पी एल च्या धर्तीवर लिलाव प्रक्रियेद्वारे निवड झाली होती. डब्लू एम पी एल च्या या महत्वाच्या स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी ईश्वरी सावकार व प्रियंका घोडके चे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Leave A Reply

Your email address will not be published.