NGN News
Latest Marathi News

देवळालीत मिठाई दुकानांची तपासणी केवळ दिखावा; परिस्थिती जैसे थे

** पुरुषोत्तम कांडेकर

देवळाली कॅम्प : एनजीएन न्यूज नेटवर्क

आगामी आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर येथील सदर बाजार भागात मिठाई दुकानांची स्टेशन हेल्थ ऑफिसर व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने संयुक्तिक तपासणी मोहीम राबविण्यात आली मात्र ही तपासणी केवळ दिखावा असल्याची चर्चा सामान्य नागरिकांमध्ये आहे.

दिवाळीनिमित्त अनेक नागरीक दुग्धजन्य पदार्थ व विविध प्रकारच्या मिठाई खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये धाव घेत असतात. मात्र ही मिठाई बनवितांना तिचा दर्जा व विक्री करतांना कुठली काळजी घ्यावी लागते या बाबींकडे अनेक दुकानदार दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे भारतीय अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणाकडून देण्यात येणाऱ्या निर्देशांचे पालन करणे अनिवार्य आहे. या तपासणी मोहिमेत शहरातील विविध मिठाई दुकानांना भेटी देत तपासणी करण्यात आली यावेळी स्टेशन हेल्थ कारवाई अधिकारी कर्नल डॅनियल मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग् कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य विभागाचे अधिकारी मोहिमेत सहभागी झाले होते. या तपासणीमुळे नागरिकांनी कॅन्टोन्मेंट प्रशासनाचे अभिनंदनही करत सांगितले की तपासणी केवळ दिवाळी निम्मित होते वर्षभर खाद्य पदार्थ, व उपहार गृह यांचकडे आरोग्य विभाग कानाडोळा करत आहे.

या मिठाई दुकानांची केली तपासणी : व्हेरायटी मिल्क सेंटर, कोंडीराम मिल्क, सागर मिठाई गरीबदास आदी. अन्य दुकानांची तपासणी करून काही ठिकाणी पाण्याचे इतर नमुने घेण्यात आले.

———–
@ दिवाळी आली की दिखावा करत मिठाई दुकानांची तपासणी करण्याचे केवळ दिखावा करत असून प्रत्यक्षात मिठाई कुठे तयार होते ते ठिकाण उपहारगृहाचे स्वयंपाक घर, रस्त्यांच्या कडेला खाद्य पदार्थ विकणारे गाड्या यांची तपासणी कधीच होत नाही. याची तपासणी होणे गरजचे आहे.

  • सागर गोडसे, शहर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट )

Comments are closed.