नाशिक/एनजीएन नेटवर्क
अकृषक ( एनए) परवानगी न घेतल्याने दिंडोरीस्थित बंद केलेली कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी ४० लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेलेल्या उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने चौकशी करण्यात येत आहे. त्यानुसार, डॉ. अपार यांच्या दिंडोरीस्थित घरासह नाशिक शहरातील गंगापूर रस्त्यावर ज्या मित्राच्या घरात ते वास्तव्यास होते, तेथेही शोध मोहीम राबविण्यात आली. दिंडोरीच्या घरात ६७ हजारांची रोख रक्कम तसेच अनेक बँकांचे खाते पुस्तके पथकाच्या हाती लागले आहेत.
डॉ. अपार हे दोन महिन्यांपूर्वी अकोल्याहून जिल्ह्यात बदलून आले. त्यामुळे त्यांच्या संपत्तीचा शोध घेण्यासाठी तपासही अकोल्यापर्यंत विस्तारणार आहे. रुजू झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत अपार यांनी मोठ्या प्रमाणावर आपदा जमावल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील तपासात अजून काय काय बाहेर येते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहणार आहे.