चांदवड/एनजीएन नेटवर्क
येथील नॅक मानांकित ‘अ’ दर्जाच्या श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाईं भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये ड्रोन संशोधनाबद्दल आवड निर्माण व्हावी व त्याचे ज्ञान अद्यावत होण्यासाठी एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालय व ड्रोन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या “पॅसेंजर ड्रोन रिसर्च लिमिटेड” या संशोधन संस्थेशी ड्रोन संशोधन प्रकल्पासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे.
आधुनिक काळात ड्रोनचे महत्व व त्याचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे व ती एक काळाची गरज झाली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये एक सहयोगी अभियांत्रिकी परियोजना सुरु करण्यासाठी ‘ड्रोन एक संशोधन प्रकल्प’ या सामंजस्य कराराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सामंजस्य करारानुसार, पीडीआरएल आणि एसएनजेबी एकत्र येताना ड्रोनसह ज्ञान आणि प्रशिक्षण विकसित करण्यासाठी सहकार्य करण्याचे निर्णय घेतले आहे. प्रमुख उद्दिष्ट असलेल्या या परियोजनेत, पीडीआरएल आणि एसएनजेबीने विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, तंत्रज्ञान प्रसारण आणि प्रशिक्षण व्याख्यानांचे आयोजन केले जाईल. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून पीडीआरएल च्या तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण प्रदान करण्याचा प्रयत्न केला जाईल.
यावेळी पॅसेंजर ड्रोन रिसर्च लिमिटेडचे विशाल जोशी (प्रशिक्षणाधिकारी) व विशाल धारणकर (मुख्य तांत्रिक अधिकारी) यांनी त्यांच्या संस्थेचा करून परिचय दिला. येत्या काही वर्षांमध्ये ड्रोन तंत्रज्ञाना मुळे कृषी, भू-सर्वेक्षण, आरोग्यसेवा, संरक्षण क्षेत्र, पर्यटन, मीडिया, ई-कॉमर्स, वाहतूक व्यवस्थापन इत्यादी अनेक नागरी क्षेत्रात वापर वाढेल. केंद्र सरकारचे २०३० पर्यंत भारताला “ग्लोबल ड्रोन हब” बनवण्याचं लक्ष्य आहे. ड्रोन निर्मिती, ड्रोन असेंबलिंग, देखभाल आणि दुरुस्ती व्यतिरिक्त, सॉफ्टवेअर अँप्लिकेशन डेव्हलपमेन्ट, ड्रोन डेटा प्रोसेसिंग, डेटा ऍनालिसिस एक्स्पर्ट, ड्रोन इंजिनियर, ड्रोन पायलट, ड्रोन इन्स्ट्रक्टर, ड्रोन सेवा प्रदाता इत्यादी क्षेत्रात देशभरात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या, स्टार्टअपस, आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील.
एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. तातेड व उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी यांनी विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पासाठी हा सामंजस्य करार महत्त्वाची भूमिका बजावेल व विद्यार्थी त्यात सक्रिय सहभाग घेतील. नव-नवीन तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी मार्गदर्शन करणारा हा सामंजस्य करार विद्याथ्यांसाठी एक उत्कृष्ट संधी असून अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि अनुसंधान यासाठी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होईल. या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सहभागाने, या दोन्ही संस्थांनी आग्रहाचे अभिप्रेत प्रयत्न केले जातील आणि विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च उद्दिष्टांसाठी प्रशिक्षण प्रदान केले जाईल असे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, तसेच प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी व सुनीलकुमार चोपडा आदींसह सर्व विश्वस्त मंडळ व सर्व प्रबंध समितीचे सदस्य आदींनी शुभेच्छा दिल्या.