NGN News
Latest Marathi News

उद्योगांसाठीची भूसंपादन प्रक्रिया गतिमान करा : पी. वेलारासू

  • नाशिकच्या बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश; औद्योगिक संघटनांशीही संवाद

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या एमआयडीसी क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योगांसाठीची भूसंपादन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले.अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतींसाठी व्यापक रस्ते विकास आराखडा तयार करून तो तातडीने सादर करावा,असेही ते पुढे म्हणाले.

पी. वेलारासू नाशिक दौऱ्यावर आले असता प्रादेशिक कार्यालयात त्यांनी अधिकाऱी आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत विविध कामांसंदर्भात आढावा बैठक घेतली.या बैठकीस आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, सरचिटणीस संजय महाजन, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष मनिष रावल,लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया,महाराष्ट्र चेंबरचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय सोनवणे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, कार्यकारी अभियंता जयंत पवार व अन्य अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी राजी करण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी औद्योगिक संघटनांचे सहकार्य घ्यावे,असेही बेलारासू यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे व निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांकडे वेलारसू यांचे लक्ष वेधले.भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याची मागणी करतांनाच एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधांकडेही लक्ष देण्याचे साकडेही त्यांना घातले.

Comments are closed.