NGN News
Latest Marathi News

भारतातील वॉटर प्युरिफायर बाजारपेठेत पावसाळ्यात ३२ टक्क्यांची वाढ

  • आरोग्याविषयी जागरूकतेमुळे उद्योगाच्या वाढीला चालना
  • आर्थिक वर्ष २६ मध्ये क्रोमाने बाजारपेठेत २२% ची वाढ होण्याचा अंदाज वर्तवला

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

पावसाळ्यात पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुरक्षिततेवर अधिकाधिक लोक लक्ष केंद्रित करत असल्याने, भारतातील वॉटर प्युरिफायर बाजारपेठेत अभूतपूर्व वाढ होत आहे. क्रोमामधील मागणीच्या ट्रेंड्सवरून असेही दिसून येते की भारतातील कुटुंबे वॉटर प्युरिफायरकडे सर्वाधिक लक्ष देत आहेत, जवळजवळ ३५% वॉटर प्युरिफायर खरेदी पावसाळ्यात होते. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वॉटर प्युरिफायरच्या मागणीत दोन अंकी वाढ झाली. पावसाळ्यात कॉलरा, टायफॉइड आणि हेपेटायटीस ए सारख्या जलजन्य आजारांबद्दल जागरूकता वाढत असल्याने हे घडले आहे.

या श्रेणीतील ग्राहकांचे वर्तन समजून घेण्यासाठी केलेल्या क्रोमाच्या उद्योग संशोधनानुसार, खालील ट्रेंड दिसून आले आहेत –

·         प्रादेशिक मागणी: आरओ खरेदीमध्ये उत्तर भारत ३१% सह आघाडीवर आहे, त्यानंतर दक्षिण (३०%), पश्चिम (२५%) आणि पूर्व (१५%) आहे.

·         तंत्रज्ञानाला पसंती: आरओ तंत्रज्ञानाची लोकप्रियता वाढत आहे, इलेक्ट्रिक वॉटर प्युरिफायर विक्रीत आरओचा वाटा जवळजवळ ९०% आहे; उर्वरित वाटा यूव्ही मॉडेल्सचा आहे.

·         रंग: सर्व प्रदेशांमध्ये काळा हा सर्वात पसंतीचा रंग राहिला आहे, विक्री झालेल्या आरओ युनिट्सपैकी ६२% चा आणि यूव्ही युनिट्सपैकी ५३% चा रंग काळा आहे, तर जवळजवळ ३०% युनिट्सचा रंग पांढरा आहे.

·         वैशिष्ट्यांची लोकप्रियता: विकल्या गेलेल्यांपैकी अर्ध्याहून अधिक युनिट्समध्ये यूएफ आणि यूव्ही फिल्ट्रेशनचा समावेश आहे; १५% मध्ये अल्कलाइन वैशिष्ट्ये आहेत; ८% तांबे तंत्रज्ञान वापरतात.

·         प्रीमियम सेगमेंटमध्ये बदल: १५,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मॉडेल्समध्ये खनिज-वर्धित कार्यक्षमता वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे.

क्रोमाने त्यांच्या ग्राहकांच्या वर्तनाचा अभ्यास केला आणि त्यांच्या निष्कर्षांनुसार, एप्रिल-जून २०२५ च्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यांच्या विक्रीत ११% ची प्रभावी वाढ आणि मूल्य वाढ १२% दिसून आली आहे. मासिक आकडेवारीमध्ये अजूनही चांगली वाढ दिसून येत आहे: एप्रिलमध्ये विक्री ८% आणि मूल्य १०% ने वाढली, मेमध्ये विक्री १२% आणि मूल्य १४% ने वाढले आणि जूनमध्ये विक्री १३% आणि मूल्य १३% ने वाढले.

प्रदेशांच्या बाबतीत, महाराष्ट्र ही क्रोमाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे, देशभरातील वॉटर प्युरिफायरच्या एकूण विक्रीत महाराष्ट्राचा २५% वाटा आहे, त्यानंतर कर्नाटक १५%, गुजरात १२% आणि तेलंगणा ८% आहे, तर उत्तर प्रदेश आणि दिल्ली यांचा प्रत्येकी कंपनीच्या प्युरिफायर विक्रीत ६% वाटा आहे.

शहरांमध्ये मागणी वाढत आहे, पुणे आणि मुंबई सारख्या महानगरीय क्षेत्रांमध्ये वापर वाढत आहे. क्रोमाने उघड केले आहे की टियर-१ शहरांमधील प्रीमियम रिटेल ठिकाणी विशेषतः चांगली कामगिरी केली आहे, जे शहरी ग्राहकांची क्रय शक्ती आणि आरोग्य जाणीव दर्शवते.

संशोधनात आढळलेला एक उल्लेखनीय ट्रेंड असा आहे की अंडर-द-काउंटर (यूटीसी) प्युरिफायर इन्स्टॉलेशनमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ३०% ने वाढ झाली आहे. सिंकखाली सहज बसणाऱ्या या डिस्क्रिट सिस्टिम्स आधुनिक ग्राहकांच्या मिनिमलिस्ट अस्थेटिक्स आणि पसारा-मुक्त किचन  काउंटरटॉप्सच्या मागणीची पूर्तता करतात आणि वेगाने लोकप्रिय होत आहेत. आधुनिक स्वयंपाकघर डिझाइनमध्ये यूटीसी प्युरिफायर इंस्टॉलेशन वाढत आहेत, तरीही ९५% पेक्षा जास्त ग्राहक अजूनही स्टॅन्डर्ड वॉटर प्युरिफायर खरेदी करतात.

एक्स्टेंडेड वॉरंटी योजना निवडणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील आर्थिक वर्ष २५ च्या पावसाळ्यात वर्षभर सरासरी १०% वरून १३.४% पर्यंत वाढली आणि आर्थिक वर्ष २६ मध्ये १२.३% राहण्याचा अंदाज आहे.

क्रोमा-इन्फिनिटी रिटेल लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले की, “पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित होत असल्याने, अधिकाधिक कुटुंबे केवळ इतर उपकरणांसाठी नव्हे तर खऱ्या उपायांसाठी क्रोमाकडे वळत आहेत. आमचे तज्ञ प्रत्येक ग्राहकांना त्यांच्या घरासाठी योग्य निवड करण्यास मदत करतात, मग ते प्रगत फिल्टरेशन असो किंवा जागा वाचवणारे डिझाइन असो. आम्हाला अभिमान आहे की, कुटुंबे ज्यावर अवलंबून असतात असे विश्वासू सहयोगी आम्ही आहोत, खासकरून अशा ऋतूमध्ये. उद्योगक्षेत्र १७-१८% सीएजीआरने वाढण्याचा अंदाज असल्याने, क्रोमाने आर्थिक वर्ष २६ मध्ये त्यांच्या वॉटर प्युरिफायर सेगमेंटसाठी २०-२२% सीएजीआरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे, जे टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये विस्तार, उत्पादनांमध्ये सतत नवोपक्रम आणि धोरणात्मक किरकोळ भागीदारीने प्रेरित आहे.”

Comments are closed.