नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
भारतात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने 15 सदस्यांचा संघ निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक 2023 च्या स्पर्धेत झालेल्या सामन्यानंतर निवड समितीची बैठक झाली. या बैठकीमध्येच विश्वचषकासाठीचा संघ निश्चित करण्यात आला.
‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, जायबंदी असलेल्या के. एल. राहुलला संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र संजू सॅमसनला अंतिम 15 खेळाडूंमध्ये स्थान मिळालेले नाही. पाकिस्तानविरुद्ध काही धावांनी शतक हुकलेल्या इशान किशनला या खेळीचं बक्षिस मिळाले असून त्याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. हा संघ निश्चित असून केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचे सांगितले जात आहे.
निवडलेला संघ असा..
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, के. एल. राहुल, हार्दिक पंड्या, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी और मोहम्मद सिराज